जीवघेणी तुझी, खोड हि साजणा, का न येतोस वेळेवरी?
आस मिटली तरी, श्वास तुटले तरी, वाट पाहीन वेड्यापरी.....
नेत्र मत्स्याकृती, कंठ मैनेपारी, डौल हंसातला घेतला,
कौतुकाची खरी बाब ऐका पुढे, अंतरी ठेवली कस्तुरी...
नेमकी कोण मी? आठवेना मला, सापडेना मला मी पुढे,
लाट उसळून वा, पाण ढाळून मी जाहले कावरी बावरी...
रोज कोंडा-कण्या घेउनी रांधते, पंचपक्वान्न विश्वातले,
झोपडीचे करी देवघर, स्त्री असे अन्नपूर्णा घराची खरी....
सांगते मी तुम्हा, मूर्त माझ्या मनी, कोणती आवडीची वसे,
जी विटेवर उभी, हात कमरेवरी, मोर मुकुटामधे साजिरी!!!!
~ भाग्यश्री कुलकर्णी.
No comments:
Post a Comment